You are currently viewing सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी साटम यांची नियुक्ती

सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी साटम यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते – फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून त्यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते फळसेवाडी असले तरीही त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे झाले. सेंट जेवियर कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयातून २०१९ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. पदवी संपादन करतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचे निश्चित केले होते. पदवीधर होताच त्यांनी बेंगलोर येथे यूपीएससीसाठी क्लास जॉईन केला. त्यावेळी कोरोनामुळे त्यांना क्लास सोडून पुन्हा मुंबईला परतावे लागले होते. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत २०२० मध्ये त्यांनी पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली त्या परीक्षेत त्या १६२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. सिंधू कन्येची सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा