You are currently viewing “राष्ट्रीय कुस्ती”  स्पर्धेत कोल्हापूरच्या नंदनीला सुवर्ण!!!!!

“राष्ट्रीय कुस्ती” स्पर्धेत कोल्हापूरच्या नंदनीला सुवर्ण!!!!!

 

 

 

 

वृत्तसंस्था:

दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय 23 वर्षाखालील स्पर्धेत हरीयाणाच्या अंकुशविरुद्ध खेळताना नंदीनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला एक वर्षापासून जास्त काळ कुस्तीपासून दूर रहावे लागले होते. अर्थातच याचे दडपण नंदीनीवर होते. अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना ती मागे होती, पण दोन वर्षापूर्वीचा वचपा काढण्याची आपल्याला संधी आहे, हे मार्गदर्शक लवटे यांचे शब्द तिला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरक ठरले.

तिने लढतीचा निकाल फिरवण्यात यश मिळवत.अखेर वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नंदीनीने सुवर्ण पदक तर स्वाती शिंदे हिने कास्य पदक मिळवित कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

नंदीनीच्या यशामुळे महाराष्ट्राचा सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवला. मुरगुड कुस्ती संकुलात या दोघींना गेल्या सात वर्षांपासून दादा लवटे यांचे मार्गदर्शन सुरू आहे.

नंदीनीच्या यशाने तर अनेक वर्ष हुलकावणी देत असलेले सुवर्णपदक जिंकता गेल्या वर्षापर्यंत आपल्या कुस्तीगीर पदकापासून दूर रहात होत्या आता ते खंडीत झाले याचे समाधान आहे, आले असे दादा लवटे यांनी सांगितले. मुंबईतील डार्फ केटल ग्रुपने या दोघींना दत्तक घेतले आहे. कंपनीने या दोघांसाठी व्यायामशाळाही उभी केली आहे. या कंपनीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी विजय पाटील, स्वाती शिंदे व नंदिनी साळुंखेला 60 हजारांची विशेष मदतीनिधी दिला होता.

खूप छान वाटत. पदकाची आशा होती, पण पदक लागेल की नाही ही धुकधुक होती, पण अखेर पदक लागल. फायनलच्यावेळी थोड टेन्शन होते. सुरुवातीस आघाडी घेतली आणि मग तिला चीतपटच केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा