You are currently viewing वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात नेहा राणे प्रथम

वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात नेहा राणे प्रथम

वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात नेहा राणे प्रथम

सावंतवाडी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जन संज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. या केंद्रातून रेडी येथील नेहा महेश राणे यांनी ७५.२५ टक्के गुणांसह प्रथम येण्याचा मान पटकावला. फणसगाव-देवगड येथील सतीश सीताराम कार्लेकर यांनी ७२ टक्के गुणांसह द्वितीय तर दोडामार्ग-मणेरी येथील निखिल नारायण नाईक यांनी ६९.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना माजी केंद्र संयोजक संदीप तेंडोलकर, केंद्र संयोजक राजेश मोंडकर, ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, मंगल नाईक- जोशी, महेंद्र पराडकर, डॉ. रुपेश पाटकर, रुपेश पाटील, अजय लाड, सचिन खुटवळकर, नीलेश जोशी, जुईली पांगम यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव तथा केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, डॉ. जी. ए. बुवा, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा