You are currently viewing पंढरी समतेचा गजर

पंढरी समतेचा गजर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”पंढरी समतेचा गजर”*

 

पंढरीची वारी होय परमात्म्याचा आनंद

तुका सांगती पंढरी सर्वश्रेष्ठ तीर्थ क्षेत्रIIधृII

 

पदयात्रेत ऊन पाऊस ना कशाची खंत

मन भान हरपून जाते तन्मय होऊन

विश्वापलीकडील विश्वाचे आकळे ज्ञानII1II

 

समतेचा गजर अवघा रंग एक होत

विसरती भेदाभेद सारे वैष्णव भक्त

आतुर असती जन घेण्या गळाभेटII2II

 

पाया पडती एकमेका स्त्रीया बाल वृद्ध

सान थोर विसरती वारकरी अहंपण

राम कृष्ण हरी गजरे गळे अभिमानII3II

 

वारी अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाई घेऊन

तिमिराकडून तेजाकडे करी मार्गक्रमण

दावी अणु-रेणूकडून आकाश-तत्त्वा पर्यंतII4II

 

जन विसरती संसार निष्काम जाती वारीत

चंद्रभागे स्नान विठू दर्शने मिळे समाधान

वांच्छिती नामसंकीर्तन साधन विश्वकल्याणII5II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा