सावंतवाडीत विवाहितेची आत्महत्या
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सौ. प्रिया पराग चव्हाण (33 ) यांनी गुरुवारी रात्री आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरु केली आहे. चौकशी नंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले .प्रिया चव्हाण यांच्या पश्चात पती ,चार वर्षाची मुलगी ,सासू-सासरे असा परिवार आहे

