You are currently viewing भूतकाळ माझा ! रक्तरंजित..!!

भूतकाळ माझा ! रक्तरंजित..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भूतकाळ माझा ! रक्तरंजित..!!*

 

माझ्या पुस्तकांतील जुनी पाने

आज ही मला भेटायला येतात

तुझ्या तावडीतून आम्ही सुटलो

याकरता मला धन्यवाद देतात..!

 

भूतकाळ होता तो माझा

अक्षरचं मी विषात बुडवायचो

वास्तवाच्या लिखाणाला! रक्ताच्या

लाल रंगाने !भडक करायचो ..!

 

मी लिहीलेली विद्रूप पाने

अब्रुदार प्रेतांची गुलाम झाली

भूक भागवण्या!दरवेशाचा खेळ कराया

माझी लेखणी !प्रेतताटीवर चढली..!

 

त्याकाळी करून शब्दांची खाडाखोड

लालसेपोटी लाचार अक्षरं गिरवायचो

कोरं पान पुढ्यात उभं असायच

त्यावर रक्त! तिर्थ म्हणून सांडायचो ..!

 

माझ्या पुस्तकांतील पाने

आजही मला भेटायला येतात

माझ्या व त्यांच्या भल्यासाठी टाळतो मी

तरीही ते !भूतकाळांत मला घेवून जातात

 

भूतकाळ माझा विसरायचा मला

अखंड भोवळीची न संपणारी झिंग

रक्तरंजित लेखणीला गाडायचं मला

पुस्तक कपाटात चोरून बसली अंग

भूतकाळ होता तो माझा

विसरायचा आहे तो मला..!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा