You are currently viewing वारी निघाली🚩🚩

वारी निघाली🚩🚩

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वारी निघाली*🚩🚩

 

वारी निघाली पंढरी

सखी सवे निघाली

घरदार विसरून

वाट पंढरीची धरली

 

 

सासू सासऱ्याचा जाच

कारभाऱ्याची ना साथ

कधी भेटेल मजला

माझा पंढरीचा नाथ

 

पंढरीच्या वाटे लागे

तुळस बाईचा ग मळा

गुंफुन तुळशी पत्राला

घालीन विठ्ठलाच्या गळा

 

गाणी, भजने, अभंग

टाळ, चिपळ्या, मृदूंग

वारीमध्ये सगळे धुंद

गाती तुकयाचा अभंग

 

जाता पंढरी नगरी

दिसे माऊली रुखमाई

दर्शन तिचे घेताच

दिसते स्वर्गातली आई

 

तुझ्या चरणाची सेवा

नित्य घडो पद्मनाभा

धन्य झालो दर्शन घेता

जीवनी पाठीशी उभा

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा