*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम अभंग रचना*
आषाढी एकादशी…एक पर्वणी…. संतस्मरण
(संत तुकाराम)
*सर्वस्व निधान*
घडो गंगास्नान | राहो आत्मभान |
सर्वस्व निधान | पांडुरंगा ||
भेटी लागी जीवा |पंढरीच्या राया ।
काकुळती पाया | म्हणे तुका ||
पतित पावन | म्हणवून घेतोस |
सोने करतोस | दगडाचे ||
तुकाराम गाथा | नदीने वाचली |
मग प्रकटली | तरंगत ||
देवा नको नको | लोभ हा विकारी |
सोडे सावकारी | क्षणार्धात ||
पतीस शोधती |रखमा विठ्याची |
आवली तुक्याची | सापडे ना ||
विजया केळकर______
नागपूर
