You are currently viewing म. रा. प्रा. शि. भारती शाखा कणकवली तालुका संघटक अनुजा रावराणे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार…

म. रा. प्रा. शि. भारती शाखा कणकवली तालुका संघटक अनुजा रावराणे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवलीच्या तालुका संघटक अनुजा गजेंद्र रावराणे यांचा सेवानिवृत्ती पर निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच तळेरे नंबर १ तालुका कणकवली या शाळेमध्ये संपन्न झाला. प्रसंगी अनुजा गजेंद्र रावराणे यांचा संघटनेच्यावतीने मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा सत्कार स्मिता कोरगावकर महिला जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवलीच्या वतीने शुभेच्छा सोहळा संपन्न करण्यात आला. प्रसंगी उपस्थित दिलीप तळेकर माजी सभापती पंचायत समिती कणकवली तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तळेरे , दयानंद नाईक राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती, संतोष पाताडे जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती सिंधुदुर्ग, किसन दुखंडे राज्य संघटक, दशरथ शिंगारे तालुकाध्यक्ष कणकवली यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला.

यावेळी अनूजा रावराणे म्हणाल्या मी जरी शिक्षक म्हणून सेवेतून निवृत्त झाले तरी, माझ्या शिक्षक भारती संघटनेचे कायम सोबत करीन. तसेच माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी जिल्हाभरातून आलेल्या सर्व शिक्षक भारती पाईकांची मी ऋणी आहे. याप्रसंगी त्यांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दयानंद नाईक राज्य उपाध्यक्ष, संतोष पाताडे जिल्हाध्यक्ष,दशरथ शिंगारे तालुकाध्यक्ष, लवू पाटील जिल्हा उपाध्यक्ष, संतोष कोचरेकर तालुकाध्यक्ष मालवण, यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संघटनेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित लहू पाटील जिल्हा रामचंद्र सातवसे जिल्हा प्रतिनिधी, बागवे जिल्हा प्रतिनिधी, संतोष कोचरेकर तालुका मालवण, सखाराम झोरे सरचिटणीस दोडामार्ग, सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न श्रीराम विभुते सरचिटणीस कणकवली, मंगेश खांबळकर कार्याध्यक्ष, मदन कुमार नारागुडे तालुका प्रसिद्धीप्रमुख, शशिकांत तांबे तालुका उपाध्यक्ष, संजय कोळी मुख्य संघटक, कल्पना सावंत महिला आघाडी, कोमल दुखंडे उपाध्यक्ष, सखाराम खरात कोषाध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम विभुते सरचिटणीस यांनी केले तर आभार मंगेश खांबळकर कार्याध्यक्ष यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा