गोगावलेना पालकमंत्री पद न मिळाल्याने डोक फिरले असेल तर हाॅस्पीटल मध्ये दाखल करू – सुरेश सावंत
कणकवली
भरत गोगावले यांनी जी वक्तव्य केलेली आहेत ती माणूस म्हणून केलेली नसून डोक्यावर परीणाम झाल्यामुळे करण्यात आलेली आहेत असे माजी सभापती सुरेश सावंत यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी वेळीच माफी मागावी अन्यथा त्यांना त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी लहान तोंडी मोठा घास घेण्याचे प्रयत्न करू नयेत. त्यांनी युतीचे भान ठेऊन बोलावे, असे माजी सभापती सुरेश सावंत यांनी म्हटले आहे.

