You are currently viewing व्रत शेवटी तोडलसं…..!!

व्रत शेवटी तोडलसं…..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*व्रत शेवटी तोडलसं…..!!*

 

खिश्यांत कोंबल्या कविता

गातोस माझी गीते

राहुट्या गुंडाळून गेलास

अवदसेची ..बाधा होते….!

 

अनिवार सुखाच्या सांगून

मलाच …माझ्या गोष्टी

व्रत शेवटी …तोडलसं

आता रेंगाळतो माझ्यासाठी..!

 

पसायदानाचा अर्थ तुला

कधीच… कळला नाही

दीठ.. वेल्हाळ स्वयंगर्वी

तुला पचणार नाही…!

 

लाखमोलाचे हे ..देणे

सहजासहजी लाभत नाही

फाटक्या दाहक देहात

संवेदनाचं..उरणार नाही..!

 

विष रिचवता.. उरी

प्राण… सोनियाचे झाले

नको संगत विखारी

लौकीकाला माझ्या ठोकरले..!

व्रत शेवटी तोडलसं..

राहुट्या गुंडाळून गेलास..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा