आ.दीपक केसरकर 1 हजार वर्षां पूर्वीचं ज्योतिर्लिंग आणू शकतात मग त्यांना रुग्णांसाठी 1 फिजिशियन आणन कठीण का होतंय?
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये फिजिशियनची नियुक्ती करण्यात आली होती या नियुक्तीला आता पंधरा दिवस उलटून गेले. ना फिजिएशनचा पत्ता ना आमदारांचा पत्ता. आमदारांच्या म्हणण्याप्रमाणे ऑन कॉल फिजिशियन दिलेला आहे परंतु ऑन कॉल फिजिशनवर किती दिवस अवलंबून राहायचं आणि इमर्जन्सी वेळेला करायचं काय?
फिजिशियन अभावी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णांना 24 तास सेवा पुरवली जाते याची दखल घेऊन या संस्थेला रुग्ण कल्याण नियामक समितीमध्ये स्थान देण्यात आले परंतु येथील रुग्णांची अवस्था पाहता हे पद उपभोगणे आता लाजिरवाणे वाटत आहे. अशी खंत रवी जाधव यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आहे.
13 बेडचा सुसज्ज आयसीयू आहे मोफत सी.टी.स्कॅन सुविधा आहे तर महाराष्ट्रामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय १० व्या नंबर वर नामांकित आहे तर महाराष्ट्र मध्ये दोन नंबरची ओ.पी.डी ही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची आहे असं असून सुद्धा या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन अभावी रुग्णांचे प्राण जात आहे तर काही रुग्णांना गोवा बांबुळी येथे पाठवण्याचे सत्र सुरूच आहे.
रुग्णांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान वाटेल ते करू शकते परंतु त्यांचे प्राण डोळ्यासमोर जाताना पाहू शकत नाही अशी खंत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव, रूपा गौंडर (मुद्राळे), लक्ष्मण कदम तसेच सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी म्हटले आहे.
1000 वर्षांपूर्वीचे देव आणून जनतेला भावनिक बनवण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये एक फिजिशियन आणून रुग्णांचे प्राण वाचवण्यात खऱ्या अर्थाने देवपण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे प्राण वाचवणारे खरे देव म्हणजेच गोवा बांबुळी येथील डॉक्टर व गोव्याचे मुख्यमंत्री मा.प्रमोद सावंत हेच आहेत. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे असे रवी जाधव यांनी म्हटले आहे.
