“राजषी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
“राजषी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना अंतर्गत सन 2025-2026 या वर्षाकरिता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार साहित्य क्षेत्रातील योगदान आणि कलाकार जे प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात (Performing art) सादरीकरण करणारे आहेत. अश्या 100 कलाकारांची निवड करून प्रती महीना रु. 5 हजार मानधन देण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी 1 जुलै ते 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.) विशाल तनपुरे यांनी केले आहे.
या योजनेसाठी लाभार्थी पात्रता:- ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात येत आहे. (दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्षे राहील). ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्षे असणे आवश्यक आहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जदार व मोलाची भर घातली आहे. वयाने जेष्ठ असणारे, विधवा,परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहिल. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.60,000/- पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमीत मासिक पेन्शन योजनेत अंतर्भुत नसलेले पात्र कलाकार. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
वरिल निकषांची पूर्तता करणारा पात्र लाभार्थीनी योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 01 जुलै 2025 ते दिनांक 31 जुलै, 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en भरण्यात यावेत.
अर्जा सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे :- लाभार्थी यांचा पती-पत्नीचा एकत्रीत फोटो(लागू असल्यास), जन्मतारखेचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (माहे मार्च 2026 पर्यंत वैध असणे आवश्यक), रहिवासी दाखला, इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरीकडे केलेले प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स (बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड क्रमांक स्पष्ठ दिसणे आवश्यक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र), राज्य, केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था,व्यक्ती यांचे शिफारस पत्र. रेशन कार्ड, सातबारा (शासकीय कागदपत्रात नाव असणे आवश्यक), लाभार्थी ज्या कलेचा उल्लेख केला त्या कलाक्षेत्रातील सहभागाबाबत पुरावे (फोटो,सहभाग प्रमाणपत्र) ऑनलाईन अर्जात असणे आवश्यक आहे.
