*माणगाव येथील अमित धुरी कुटुंबीयांचे मा. आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन*
कुडाळ
वसोली येथील कॉजवेवर पुराच्या पाण्यात वाहून दुखद निधन झालेल्या माणगाव येथील अमित मोहन धुरी यांच्या घरी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन धुरी कुटुंबीयांचे सात्वन करत कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी शिवसेना माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी पं. स. सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, माणगाव उपसरपंच बापू बागवे, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, माणगाव विभाग संघटक कौशल जोशी, संजय धुरी उपस्थित होते.

