जिल्हास्तरीय सुबोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
सुब्रोतो मुखर्जी एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीव्दारे सन 2025-26 या वर्षी आयाजित करण्यात येणाऱ्या 64 वी आंतरराष्ट्रीय सुबोता मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर,ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा आयाजित होणार आहेत. या स्पर्धा 15 वर्ष खालील मुले (सब ज्युनियर) व 17 वर्ष खालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटाच्या आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 3 जुलै 2025 रोजी 15 वर्ष खालील मुले (सबज्युनियर) 17 वर्ष खालील मुली (ज्युनिअर) व 4 जुलै 2025 रोजी 17 वर्ष खालील मुले (ज्युनिअर) सकाळी 9 वाजता कुडाळ तालुक्यातील श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.
सर्व शाळांना, संघानी सहभागापुर्वी sindhudurga.mahadso.co.in/school या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्राथमिक नोंदणी प्रवेश फी व ऑनलाईन प्रवेशिका भरलेल्या नोंदणीकृत संघांनाच या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी यांची नोंद घेऊन व आपला फुटबॉलचा संघ घेऊन वेळेवर स्पर्धा ठिकाणी उपस्थिती रहाण्याचे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसुळ यांनी केले आहे.

