साहित्यलेणी प्रतिष्ठान, सासष्टी महिला संघटना व आयएमबीचे आयोजन
पणजी, ता.
साहित्यलेणी प्रतिष्ठान, ताळगाव, सासष्टी महिला संघटनी आणि इनस्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा तर्फे लिहिणाऱ्या हातांचा उत्सव या उपक्रमांतर्गत साहित्यगंध हा कार्यक्रम पाच गोमंतकीय लेखकांच्या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २७ जून, २०२५ रोजी इन्स्टिट्युट मिनेझिसच्या परिषद कक्षात दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी असतील. कार्यक्रमाचे उद्घाटन मिनेझिस ब्रागांझा या संस्थेचे सदस्य सचिव अशोकजी परब करतील. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर व सासष्टी महिला संघटनेच्या रजनी अरुण रायकर यांनी केले आहे.
साहित्यलेणी प्रतिष्ठानने आजपर्यंत पुस्तकांवर चर्चासत्रे, मुक्तिनंतरची कविता आणि मुक्तिनंतरची कथा यावर परिसंवाद, साहित्यसंमेलने, कविसंमेलनांचे आयोजन केले आहे.
उभ्या रेषेचे वर्तुळ या दयाराम पाडलोस्कर यांच्या कादंबरीवर गजानन देसाई, सचिन मणेरीकर यांच्या फणस या कथासंग्रहावर डॉ. प्रा. विनय बापट, तृप्ती बांदेकर यांच्या अवचिता परिमळू या कवितासंग्रहावर रजनी रायकर, रेवा दुभाषी यांच्या पाळी आणि बरेच काही या लेखसंग्रहावर अपूर्व ग्रामोपाध्ये आणि डॉ. भूषण भावे यांच्या विचारवाटिका या पुस्तकावर चंद्रशेखर गावस भाष्य करतील.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मिरिंगकर करणार आहेत, असे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश क्षीरसागर यांनी कळविले आहे.

