*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आनंदघनची वारी…..*
आस माऊली माऊली
माझी विठाई माऊली
आषाढाचे आगमन
हरिती आनंदघन
संततधार वर्षाव
विठू नामाचा गजर
नेत्र आसुसे दर्शन
ओघळती रात्रंदिन
सावल्या विठूचे पाय
कधी दिसे बाप माय
पंढरी निघे पालखी
तुकाराम ज्ञानियाची
सोपान रे मुक्ताबाई
सोबत येती पालखी
आशिष निवृत्तीदास
घडे या संत जनांसी
दिवेघाट पार होई
नजरे दिसे पंढरी
पायी पायी चालतसे
वारकरी पुढे मागे
दिंड्या पताका हाती
मुखे नाम ते माऊली
माऊली माऊली म्हणे
भेट उराउरी घडे
रंग भेद जातीभेद
नसे विसंवाद घडे
लाख संख्येने जमाव
पुढे जातसे चालत
सोहळा हा अनुपम्य
बघता बघता रिंगण
पालखीचा भोई संगे
विठू लावे हातभार
रम्य वारकरी दिंडी
नाचे डोले भुईवरी
आली आली रे पंढरी
नेत्री ओलावले पाणी
आली आली रे पंढरी
आळंदी देहूची वारी
जय विठ्ठल विठ्ठल
करू नामाचा गजर
पांडुरंग हरी नाम
घेऊ विठ्ठल विठ्ठल …
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
………………………………..
©पल्लवी उमेश
(आषाढस्य प्रथम दिवसे…)

