*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आभाळाची गाणी…*
सध्या सुचतात पावसावर गाणी
जणू आभाळाची आहे राणी
जिकडं तिकडं हो पाणीचपाणी
जणू आलिया आणिबाणी
वनी नाचतोय छुमछुम मोर
वेड झालंया पावसाचं पोरं…
रानावनात हिरवाई पेरली
भात शेतात मिरतात ईरली
चिखुलपाण्यात लावतांना भात
येतंय् किरडू अलगद हातात
ढवळ्यापवळ्याची सुंदर जोडी
कशी झक्कास औतास ओढी…
पावसापाण्यात शेतं सुंदर
पेरा म्हणतंय् पावसाचं पोर
इकडे पावसानं लावलीया झडी
फुले फुलल्यात फुले गुलछडी
बांधाबांधानं जवार उभारं
पांखरं काढत्यात रोजचं खोडी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

