You are currently viewing हाती आपल्या धुपाटणे आले

हाती आपल्या धुपाटणे आले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हाती आपल्या धुपाटणे आले*

 

बोथट झाल्या *संवेदना*
बाप नव्हे तो *कर्दनकाळ*
घेऊन हाती कायदा बिनधास्त
*व्यर्थ तोडली त्याने नाळ*….1

*शिक्षण सारे वाया गेले*
झाला चुथडा आणि व्यय
डाग लागला *प्रचंड मोठा*
नक्कीच नव्हता हा उपाय………2

यशाची असते पहिली पायरी
पचवावे लागते *अपयश*
कळतात वेदना परीश्रमाच्या
अपयशीच रचतात इतिहास……3

विचारवंता हे *अशोभनीय*
दुष्कृत्याने आणलीत लाज
शिक्षण गेले चुलीत आपले
*थुंकला रागावर समाज*……..4

असून आपण *हेड मास्तर*
करू नये ते करून बसले
जीवा परी तो *गेला जीव*
हाती आपल्या धुपाटणे आले……5

विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा