दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्ती बाबत गावांना विशेष सहाय्य मिळणे बाबत
गणेश प्रसाद गवस यांचे मंत्री-वने गणेश नाईक यांना निवेदन सादर
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यामध्ये गेल्या २० वर्ष हत्ती नुकसान करत आहेत. त्यासाठी आवश्यक असण्याऱ्या नुकसानभरपाईचे अत्यंत कमी असून त्या मध्ये वाढ करणे गर्जेचे आहे. हत्ती ही समस्या महाराष्ट्र राज्याची असून त्यासाठी विशेष बाबत स्वतंत्र फाॅरेष्ट स्टाफ निर्माण करावा व त्या साठी एक रेंजर, एक फॉरेस्टर व पाच गार्ड असा स्वतंत्र स्टाफ वन खत्यामध्ये निर्माण करुन त्यांच्या वर फक्ट हत्ती हटाव मोहिम व हत्ती पासून गाव वस्तीला संरक्षण करण्यासाठी जबाबदारी निच्चित करावी व त्याची नियुक्ती सिंधुदूर्ग जिल्हयात करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना दोडामार्ग चे तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी श्री. गणेशजी नाईक मंत्री-वने, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. यांना दिले आहे.
