कणकवली :
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंत्री नितेश राणे यांचे निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्याची जोरदार आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

