You are currently viewing का दाखवा कुणाला…

का दाखवा कुणाला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*का दाखवा कुणाला…*

 

जखमा उरातल्या ह्या का दाखवा कुणाला

लागला जरी किती ही हा जीवही पणाला..

 

दाखवून काय होते? मिळते का सांत्वनास

सामोरे जावे लागे पदरात उपहास…

 

जखमा कुणास नसती दडवून हासतात

कुजती किती ती हृदये जीवनेच नासतात..

 

किती क्रूर आहे दुनिया ती हिंस्र श्वापदे हो

दिसतात सभ्य फक्त छळ करती खूप खूप..

 

जन अंतरंग काळे वरवर हे उमाळे

कपटात माखलेले दु:शासनच सगळे…

 

वाली ना आईस ही तिज विकावयास निघती

वृद्धाश्रमात नेती गहाण सारी नीती…

 

ना दया आहे माया सारीच हो उधारी

बाजार भावनांचा विकतात हो व्यापारी…

 

साराच नाईलाज फसवाच हा बाजार

हा वर्ख हा मुलामा दुबळेपणा आजार…

 

धरताच चावतात सोडताच पळतात

आपलेच आपल्याला जगती हे नडतात…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा