*पंचशील ट्रस्ट व अभाअंनिसतर्फे ओरोस येथे वृक्षारोपण*
ओरोस
पंचशील सेवा ट्रस्ट आदर्श नगर ओरोस व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यापीठ नुकतेच जिजामाता चौक ते हुमरमळा हायवे लगत दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले . दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून हा वृक्षारोपणाचा उपक्रम साजरा करीत आहे .
ओरोस ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग मालवणकर यांचे हस्ते वृक्षलागवड करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . त्यानंतर प्रा . वैभव कदम यांचे नुकतेच लग्न झाले होते त्यांनी सहकुटुंब वृक्ष लागवडीस सहभाग घेतला . यावेळी पंचशिल सेवा ट्रस्टचे आदर्श नगरचे अध्यक्ष संजय खोटलेकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर,सदस्य राजन वालावलकर, नामदेव मठकर, चंद्रकांत कदम गुरुजी, शंकर भोगले , भास्कर चव्हाण, शरद सोनवडेकर , मयेकर, अरुण सावळे आदी जागृत नागरीक उपस्थित होते . रस्त्याच्या दुतर्फा कडूलिंब, सांग, , बदाम, ,चिंच, वड अशी कायमस्वरूपी सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली . यावेळी शोभा मोतीराम कसालकर अधिपरिचारिका सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हिनेही आपल्या वतीने या कार्यक्रमाला वृक्षांचा पुरवठा केला होता .
श्री . घोगळे सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थितांना चहा बिस्किटाची सोय केली .

