आजन्म असलेलं नातं,
आज झोप न लागल्याने उलगडतंय,
असलेली नाती उलगडायला,
झोप उडावी लागते हे खरं😉
आहे का तुमचं पण असंच??
👇👇👇😉
नातं की पातं??❤️
मी थांबलो,
की तू पळतोस।
तू थांबला,
की मी पळतो।
तुला पळवायला वीज धार,
अन मला पळवायला स्वप्नं ।
माझ्या साखर झोपेतल्या स्वप्नांना,
तू सुंदर बनवतोस ।
माझ्या स्वप्नपूर्तीच्या घामातही,
तूच गारवा देतोस।
वाटत असेल तुला,
एवढं करूनही टांगलेला,
तुटून पडावं माझ्यावर।
पण, तूच सरस माझ्या राजा,
म्हणून कळसाच्या जागी ठेवतो।
निस्वार्थ आपल्यात टिकावा म्हणून,
मी जमीनीवर झोपतो।
तुझ्या पात्यांवरची धूळ,
माझ्याही मनावर साचते।
साफ केली मिळून,
की सुंदर नाते टिकते।
तू पात्यांनी फक्त हवा दे,
मीपण घाव घालत नाही।
बघूया, दुनियादारीची कोणती हवा,
गार लागत नाही।
खरंच रे, अजब नातं आहे आपलं,🤔
#पंखा☢️😉
(सुधीरांजली)✒️
सुधीर पाटील, नाशिक
९०२१२८३९४६