*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शाळेचा बाक…आणि ती……!!!*
सहावी..!!
स्मृतीही थकल्या आता..
अजूनही शाळेच्या बाकावर ती..
ती अजूनही !माझी वाट पाहते…
सांगितलं तिला!वय झालं आपलं
इतकी वर्ष उलटून गेलीत …
आजही ती बाकावर माझी वाट पाहते..!
नकळत शाळेची घंटा वाजू लागली
सरस्वती वंदना पोर गाऊ लागली
रांगेत मी उभा!ती शेजारी पण दूर
नजरानजर होताच ती लाजली…!
तिचा गोरामोरा चेहरा आजही
डोळ्यापुढून कधी गेला नाही..
ते काय होतं नेमकं!उमगलचं नाही
ते प्रेम होत कां!कधी कळलचं नाही..!
आठवणींना चाळवता चाळवता
ती माझ्यात कविता पेरत गेली
आजही शाळेच्या बाकावर ती
माझी वाट पाहत !वर्षानुवर्ष बसली..!
चुकतयं माझं!कळतयं मला !तरी पण
सारखं सारखं चुकावसं कां वाटतं..
प्रेमाची भाषा!शाळेत कधीच कळलीच नाही
शाळा नव्हतीच ती!तेआमचं मंदीर होत.!
आजही शाळेच्या बाकावर..
इतकी वर्ष उलटून गेली..
ती माझी वाट पाहत आहे
शेवटची घंटा कधीची.. वाजली…!!
बाबा ठाकूर धन्यवाद
अजूनही शाळेच्या बाकावर…
ही माझी Tag line यावरची सहावी कविता…..!!
