पुणे : येत्या २६ जून रोजी येणाऱ्या राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या सुप्रसिद्ध शांतिदूत संस्थेतर्फे महाराष्ट्रातील मिशन आय ए एस चे संचालक व राजश्री शाहू महाराजांवर पहिली कादंबरी प्रकाशित करणारे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय शांतीदूत पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या २६ जून रोजी पुणे येथे मान्यवर सनदी अधिकारी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पुण्याचे अपर आयुक्त श्री शिवकुमार साळुंखे अपर पोलीस आयुक्त श्री प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त श्री निखिल पिंगळे सुप्रसिद्ध गजल गायक गजल सम्राट श्री भीमराव पांचाळे प्रशांत महाराज मोरे प्रा. डॉ. संजय चोरडिया प्राचार्य रामदास चवरे सुप्रसिद्ध उद्योजिका सुप्रिया वळवे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध उद्योजक व टॉयलेट मॅन म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले उद्योजक श्री रामदास माने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील एलओसी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात स्वातंत्र्य समता व बंधुता या त्रिसुत्रीसाठी गेल्या ५० वर्षात केलेला कार्याचा गौरव म्हणून हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे असे या पुरस्काराचे जनक व सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री विठ्ठल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे.
गेल्या ५० वर्षापासून प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक शैक्षणिक व मिशन आयएएस या क्षेत्रामध्ये निस्वार्थ भावनेने काम करीत आहेत. फक्त एक रुपयामध्ये आय ए एस या परीक्षेचे प्रशिक्षण देऊन त्यांनी मोठ्या संख्येने सनदी व राजपत्रीत अधिकारी घडविले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २००८ साली त्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्यावरील पहिली मराठीतील कादंबरी प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांचे हे कार्य महाराष्ट्राबरोबर इतरही प्रांतात सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी १६१७८ व्याख्याने देऊन व ७३ पुस्तके लिहून एक नवीन विक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या पन्नास वर्षातील कार्याची दखल घेऊन शांतीदूत संस्थेने त्यांना यावर्षीचा राज्यस्तरीय शांतिदूत पुरस्कार देऊन गौरवण्याचे ठरविले आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई मिशन आय ए एस चे अध्यक्ष ज्ञानदेव मोडक डॉ. रमेश गोतखेडे श्री राजेंद्र इंगोले श्री माधव रेखे डॉ. गजानन उन्हाळे व श्रीधर जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रकाशनार्थ
रवींद्र दांडगे
जनसंपर्क अधिकारी
मिशन आयएएस
अमरावती

