*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संगीत*
वाल्मिकी मुखे आली छंदोबद्ध शब्दावली
झाला रामायण काळी जन्म भारतीय संगीताचा
चारही वेदातील सामवेद असे संगीतमय वेद
हा तरआविष्कार सरस्वतीच्या प्रतिभेचा…१
आहे सांगितली पुराणकथा संगीताची
उगम संगीताचा शंकराच्या तांडवनृत्यातून
करिती गायन ऋचा मंत्राचे ईश्वरासाठी
अप्सरांचे गायन वादन मनोरंजनातून… २
मार्गी संगीत गंधर्व संगीत
काळानुरूप जरी झाले नष्ट
देशी संगीत, गीते पारंपरिक
जातिगायनासाठी अपार कष्ट… …..३
राजाश्रय दरबारी संगीताला
थोर परंपरा गुरु शिष्याची
जरी धार्मिक मर्यादित व्याप्ती
होती वेदकाळी वैदिक संगीताची. … ४
प्रथा फ्रान्सची संगीत दिनाची
नांदावी शांती हा हेतू सर्वांचा
ताल सूर लय बनवी गीत
सुरावट शब्दरचनेला दिन गौरवाचा… ५
पहिला अविष्कार भारतीय संगीताचा
गीत गोविंद केले कवी जयदेवांने
उगम राग पद्धतीचा झाला
लय स्वर लोकभाषेचा आवडे सर्वार्थाने… ६
मनाला मोहवी निसर्ग संगीत
ध्वनी अनाहत उमगे तत्वज्ञान
रिझवी शरीर मन, मेंदू
नाद अनाहत सांगे ब्रह्मज्ञान… … … .७
शिकावे संगीत तल्लीनतेने
बाणावा गुण आसन विजय
प्रवाही लवचिक असे संगीत
असो बदल तरी स्थान अजय… … … ८
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏
९३२३४९१११३

