You are currently viewing सावंतवाडी केसरी-फणसवडे एस्.टी. बस सेवा १ फेब्रुवारी पासुन सुरु; आगार व्यवस्थापक वैभव पडोळे

सावंतवाडी केसरी-फणसवडे एस्.टी. बस सेवा १ फेब्रुवारी पासुन सुरु; आगार व्यवस्थापक वैभव पडोळे

सावंतवाडी

तब्बल अकरा महिने बंद असलेली सावंतवाडी केसरी-फणसवडे शालेय वेळेतील एस्.टी. बस सेवा सोमवार दि. १ फेब्रुवारी २०२१ पासुन सुरु करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना दिली. गेले अकरा महिने कोरोना मुळे शाळा बंद असल्यामुळे सावंतवाडी केसरी-फणसवडे शालेय वेळेतील एस्.टी. बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतु कोरोना काळात बंद असलेली शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थी वर्गाचे शालेय नुकसान टाळण्यासाठी सावंतवाडी आगार मधून सकाळी ८ वाजून ४५ मि. व दुपारी १ वाजून ३० मि. एस.टी. बस सोडण्यात येणार आहे. असे आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा