माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खासदार नारायण राणे यांची माहिती
६ फेब्रुवारी रोजी सुरू होणार सिंधुदुर्गातील पहिले मेडिकल कॉलेज
पडवे
केंद्रीय मंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता लाइफटाईम मेडिकल कॉलेजचे उदघाटन करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ,प्रवीण दरेकर, विनोद तावडे, आशिष शेलार, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
मेडिकल कॉलेज च्या उदघाटनानंतर गृहमंत्री अमित शहा भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लाईफटाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे देशातील दर्जेदार संस्थां मधील एक आहे.
कोकणच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. देशभरातील १५० मेडिकल स्टुडंट च्या पहिल्या बॅचचे ऍडमिशन पहिल्याच दिवशी फुल झाले आहेत. अगदी माफक दरात लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मुंबई पुणे येथे होणारी ऑपरेशन्स झाली आहेत असेही राणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना खासदार श्री.राणे म्हणाले, एकीकडे वीजबिल माफीची घोषणा करून दुसरीकडे वीजबिल न भरणाऱ्यांचे विजकनेक्शन तोडणाऱ्या राज्य सरकार विरोधात भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. ३०० पेक्षा जास्त उपोषण २६ जानेवारीला झाली हे सरकारचे अपयश आहे.फसवा फसविचा गेम सरकार खेळत आहे. वेळ मारून नेण्याचा प्रकार चालू आहे.कोणतीही साधन सामग्री नाही. चिपी विमानतळ च्या कामाची, रस्ता, केबल टाकणे, रणवेचे काम करणे गरजेचे आहे. पाण्याची व्यवस्था करा.तारीख जाहीर करण्यात जे पुढे पुढे धावता ते जमीन देण्यास विरोध करत होते. अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला. यांच्या अंगात पाणी नाही ते विमानतळ ला पाणी काय देणार? असा सवालही केला.