*ज्येष्ठ साहित्यिका चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌹🌹🌹ऋण🌹🌹🌹
निरपेक्ष मनाने जगता यावे
याच अपेक्षेने जगतेय मी
मनावरचे ओझे किती सोसावे
तो भारच सोडून दिलाय मी
डोळ्यांतल्या रंगीत स्वप्नांचे पारवे
त्यांचे पंख मिटून ठेवलेत मी
जीवनाच्या सारीपाटाचे परतावे
शुभ्र धवल कोरे करुन ठेवलेत मी
उगाच इंद्रधनुष्यी रंगांचे हेलकावे
रुक्षपणे मागे ढकलून दिलेत मी
नकोतच कुणाशी फुकाचे हेवेदावे
स्वहक्काचेही सारे सोडलेय मी
फुलांच्याबगीच्यातील सोडून ताटवे
निवडुंगबनाची वाट धरली मी
दुःखात स्वतः चीच पुसून आसवे
त्यातच स्वसुख मानतोय मी
अंतर्मनाच्या वेदनांचे हेलकावे
त्या भोवर्यातच गरगरतो मी
वास्तवाच्या विस्तवाचे चटकदिवे
सहज तनमनावरी झेलतो मी
आता सरले सारे न वाटे काही हवे
देवा मोक्ष दे, ऋणमुक्त होईन मी
☝️🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर.
मुंबई विरार

