ऑलिम्पिक डे निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिकची स्थापना ग्रीस येथे दि.23 जून 1994 रोजी पिअर दी कुबर्टिन यांनी केली. आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (ICC) तसेच जगातील सुमारे 200 पेक्षा अधिक देशाचे ऑलिम्पिक संघ हे जागतिक ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून 23 जून रोजी ऑलिम्पिक डे साजरा करतात. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे “भारतीय ऑलिम्पिक संघ ” व राज्याचे “महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएश्न ” हे सन 1952 वर्षापासून “ऑलिम्पिक डे” व ऑलिम्पिक सप्ताह साजरा करीत आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर ऑलिम्पिक डे साजरा करण्यात यावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी युध्दा आपआपल्या ठिकाणी खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ऑलिम्पिक दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करुन ऑलिम्पिक डे उत्साहात साजरा करावा, असे आवासहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
