*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*खेळ कुणाला दैवाचा कळला!*
खेळ कुणाला दैवाचा कळला,
स्वप्ने रंगवित नव्या जगाची,
प्रतीक चालला होता लंडनला !
सोबत होती पत्नी न् कच्च्या-बच्चांची!
विमान आपण बघतो आकाशी,
सुख वाटते मनास उडण्याच्या कल्पनेशी!
‘टाटा, बाय-बाय’ करुनी निघाले,
कुटुंब चालले हो परदेशी !
तीन पिले अन आई बाबा,
खुशीत होते कल्पनेच्या राज्यात!
सुख समृद्धी मिळवण्यास ते,
चालले होते परदेशात!
कसली चाहूल नव्हती त्यांना,
घडणाऱ्या त्या अघटिताची!
आनंदाने निरोप घेता,
छबी काढली सर्वांची!
पुन्हा न दिसणे आता येथे,
भारतातील सग्यासोयऱ्यांना!
कायमचे ते निघून जातील,
काय कल्पना सगळ्यांना!
असे दुःख कोणा न यावे,
हुंदका मनी दाटून येतो!
अशाश्वततेच्या आयुष्याला,
माणूस सतत हा तोंड देतो!
उज्वला सहस्रबुद्धे
