*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम अभंग रचना*
*अभंग*
विषय -पाऊले चालती पंढरीची वाट
पंढरीची वाट /चाले वारकरी
पावसाच्या सरी /बरसती//१//
आनंदाने नाचे /भक्त वारकरी
निघाले पंढरी /विठुराया //२//
वाजविति टाळ/विठूचे अंगण
घातले रिंगण /विठू घरी//३//
चरणाशी देवा /विरे अहंकार
संपला अंधार /जीवनाचा//४//
हृदय मंदिरी /आसं तुझी देवा
अंतरीचा भावा /देवा घरी//५//
सौ भारती वसंत वाघमारे
मंचर

