You are currently viewing पाऊस आणि तू

पाऊस आणि तू

*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस आणि तू*

 

पाऊस आणि तुझ नातं

जरा जास्तच घट्ट आहे

म्हणून……

तुझ्या मर्जीने तो येतो

बिनधास्तपणे तुझ्यासोबत खेळतो

मग तू ही मनसोक्त भिजते

बेधुंद होऊन पावसाला मिठीत घेते

 

तुला भिजलेलं पाहून

पाऊस जरा जास्तच लाडावतो

म्हणून……

तुझ्यासाठी किती सरी धावून येतात

तुझ्या भोवती पिंगा घालतात

मग तू पावसाच्या नादात हरवून जाते

थेंब थेंब पाऊस ओंजळीत भरते

 

कधी कधी पाऊस हळवा होतो

कधी कधी कडवा होतो

म्हणून…….

गरमागरम भजीचा मोह आवरत नाही

पावसात भिजल्याशिवाय

पाऊसही कळत नाही

मग गोड गुलाबी गारवा

पांघरूण घेतांना

वाफळलेली चहाची फुर्की मारतो

खिडकीत उभा राहून तुला डोळेभरून पाहतो

 

वारा तुला छेडताना

तू जास्तच सुंदर दिसतेस

म्हणून…..

पाऊस जराही थांबत नाही

तुझ्याशिवाय त्यालाही करमत नाही

मग तुझ्या गालावरची खळी पाहून

पाऊस जोरात कोसळतो

रूप देखणं पाहून

कधी खळखळून तर कधी

मनमोकळा होऊन वाहतो

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा