You are currently viewing देव धर्म आणि देश यांच मुळ स्थान म्हणजे अध्यात्म

देव धर्म आणि देश यांच मुळ स्थान म्हणजे अध्यात्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*देव धर्म आणि देश यांच मुळ स्थान म्हणजे अध्यात्म*

 

****************************

काही वर्षांपूर्वी माणसाने अध्यात्मिक असावं किंवा नसावं,यावर मोठा वाद झाला होता.तसेच देव खरचं आहे का? यावरही खलबत निर्माण झाली होती. शिवाय काही विज्ञानवादी लोकांनी पंढरपूरची वारी वर सुद्धा शंका उपस्थित केली होती.पण देव नसता तर विज्ञान जन्माला आले नसते.विज्ञानाचा पाया मुळात अध्यात्मिक आहे आणि अध्यात्माच्या जोरावर सृष्टीची निर्मिती झाली आहे म्हणून मला वाटतं देव आहे.देव नाही असं जर कुणाला वाटत असेल किंवा अध्यात्माचा अंश जर त्यांच्यात नसेल तर कदाचित त्याचं आयुष्य निरर्थक समजाव.रोज देवळात जात नसेल पण एखादे मंदीर दिसले तरी नकळतपणे हात जोडले जातात किंवा मंदिरातल्या मुर्ती कडे पाहीले तरी एक अध्यात्मिक भाव आपल्यातून प्रकट होतो आणि आपसूकच आत जोडतो.अरै अध्यात्म आहे म्हणून असं होत असत.नाही तरी या जगात नास्तिकांची काही कमी नाही. पण त्या नास्तिकांना जगवणाराही परमेश्वरा शिवाय दुसरा कोणी नाही हे विसरू नये. देव आहे म्हणून मी आहे असा भाव नसता तर या विश्वातील माणसे अगदी दगडासारखे सुस्त राहीले असते.देव आहे म्हणून अध्यात्म आहे,अध्यात्म आहे म्हणून माणूस माणसाशी माणसासारखा वागतो.अध्यात्मातून निर्माण होणारा भाव दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव करून देतो.भाव आहे म्हणून वेदना कळतात,काळजी करतो,एकमेकांशी सलोख्याने वागतो,प्रेम करतो,प्रेमाचे बोलतो,मदत करतो, सुखदुःखात सहकार्य करतो.हे सर्व अध्यात्मिक उर्जा असते म्हणून होत.देव नसता तर प्रथमतःमाणूस जन्माला आला नसता.म्हणून आजच्या घडीला विज्ञान कितीही प्रगतीपथावर असलेतरी त्या मागे अध्यात्मिक बळ आहे.कर्ताकरवीता परमेश्वर आहे म्हणूनच विज्ञानाची कास धरून माणूस आज प्रगतीच्या वाटेवर समर्थपणे पावले टाकतोय अन्यथा समुद्राच पाणीही गोड राहील असतं.खरतर माणसांची दिनचर्या ही देवाच्या भरोशावर आहे.देवाने जर माणसाला सकाळी उठवायचे विसरला तर माणसाचं काय होईल हे सांगायला नको.कारण अध्यात्म आणि अध्यात्मिक भाव यात एव्हढे बळ असते की एखादे संकट जरी आले तरी प्रत्येकजण देवाच्या धावा करतो, परमेश्वराच नामस्मरण करतो त्यावेळी देवाप्रती भाव असलेली अध्यात्मिक उर्जा माणसाला सही सलामत संकटातून बाहेर काढते,तेव्हा कोणतही विज्ञान कामी येत नाही.कारण विज्ञानाचा रचियेताच परमेश्वर आहे.त्यामुळे अध्यात्म आणि देव यावर जर कोणी काही आगळावेगळा विचार करत असेल तर तो त्यांचा मुर्खपणा समजावा.

माझ्या बाबतीत जर कोणी वेगळा विचार करत असेल तर तो मला मान्य आहे कारण मी पुर्णतः अध्यात्मिक, धार्मिक आहे देवाला मानणारा आहे.रोज सकाळी देवपूजा केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही किंवा माझ्या दैनंदिन कामाला सुरवात करत नाही.माणसाच्या प्रत्येक चांगल्या कृतीमध्ये परमेश्वराचा सहभाग असतो म्हणून आपोआपच माणूस देवापुढे नतमस्तक होतो.जेव्हा जेव्हा मला भिती वाटायला लागते किंवा मी काहीतरी अडचणीत आहे तेव्हा मी देवाच्या धावा करतो, परमेश्वराची मदत मागतो विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका पण तेव्हा भगवंत निश्चितच कोणाच्यान कोणाच्या रूपात येऊन मला मदत करतो.का तर परमेश्वरा शिवाय काहीच पुर्ण होत नाही.अध्यात्म आणि देव हेच अंतिम सत्य आहे यावर विश्वास ठेवावाच लागेल.कदाचीत माझ्या मताशी सगळेच सहमत असतील असं नाही पण हा लेखनप्रपंच मांडण्याच कारण एकच की मी फेसबुकवर एक व्हिडिओ बघितला.कालपर्वा अहमदाबाद येथे विमानाचा अपघात झाला त्यातून एकच वाचला बाकी सर्व प्रवासी मृत्युमुखी पडलेत.अत्यंत वाईट घटना घडली.कुणालाच माहीत नव्हते की हा आपला शेवटचा प्रवास आहे.सार काही डोळ्या देखत घडले.आणि होत्याचे नव्हते झाले‌. एका क्षणात संपून गेले देहाची राख झाली.त्यानंतर त्या अपघातग्रस्त विमानाची तपासणी झाली तर सारेकाही बेचिराख झाले असतानाही तिथे छान बिन करणाऱ्यांना एक एक भगवतगीता सापडली. ती भगवतगीता जशीच्या तशी चांगल्या अवस्थेत पडली.माणसांची राख झाली पण भगवतगीतेला काहीच झाले नाही.माणसाचा जन्म मृत्यू हे तर विधिलिखित असते म्हणून माणूस मरतो पण अध्यात्म अमर आहे त्याला मरण नाही हे कालचा फेसबुकवर पाहिलेल्या व्हिडिओ वरून सिध्द झाले.अध्यात्म आहे म्हणून माणूस धार्मिक आहे. अंधश्रद्धेचा भाग सोडला तर देव आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.विचार कण्यासारखी गोष्टी आहे की विमानतळ अपघातात सारेकाही राख झाल्यावरही फक्त भगवतगीता सुरक्षीत सापडावी हि देव लिला नाही का? देव धर्म आणि देश यांच मुळ स्थान अध्यात्म आहे.देव आहे म्हणून धर्माची निर्मिती झाली धर्मा आहे म्हणून देश उदयास आला. आणि या देशात अध्यात्म टिकून आहे हे विशेष.तेव्हा विचार करा देव आणि अध्यात्मिकता आपल्यातून निघून गेली तर माणसाचं आयुष्य निरर्थक झाले असते.तेव्हा देव आहे म्हणून अध्यात्म आहे.अध्यात्म नसते तर एव्हढा मोठा भयंकर विमान अपघात झाल्यावरही श्रीमद्भगवद्गीता सुखरूप सापडली नसती.काय……

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा