शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथे प्रोस्टेट ग्रंथीची यशस्वी शस्त्रक्रिया
सिंधुदुर्गनगरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथे प्रोस्टेट ग्रंथीची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील 77 वर्ष वयाच्या वयोवृद्ध रुग्णाला प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यामुळे असंख्य वेदना व त्रास होत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनंत डवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली युरोसर्जन डॉ. सागर कोल्हे व सर्जन डॉ. निकिता मॉन्टेरो यांनी योग्य निदान करून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. बधिरीकरणाचे कामकाज डॉ. रविराज पोळ, डॉ. नूतन खरगे, डॉ. यश कनबर, डॉ. धनश्री केने यांनी पार पाडले.
ही शस्त्रक्रियेमध्ये स्टाफ नर्स रुपम कुडाळकर यांचे सहकार्य लाभले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथील सर्जरी विभागामध्ये युरोसर्जन उपलब्ध असल्यामुळे मूत्रविकाराशी संबंधित किडनी व मुत्राशयातील मुतखडे तसेच इतर आजाराशी संबंधित अनेक ओपन व दुर्बिणीद्वारे अशा अनेक शस्त्रक्रिया तसेच डायलिसिस करिता असणारी ए-व्ही फिश्चुला इ. अशा अनेक युरॉलॉजी शस्त्रक्रिया डॉ. सागर कोल्हे यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.

