*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शाळेतली आठवण*
——————————-
शाळाच फार आवडायची
होते बरेच आवडते विषय
कमी आवडीचा गणित विषय
म्हणून झाला कवितेचा विषय ।।
नावडतीचे मीठ जसे अळणी
तशीच या गणिताची कहाणी
मोठे शत्रू वाटे गणिताचा विषय
नापासच्या भीतीने,डोळा पाणी ।।
गणिता विषयाचे एक बरे होते
वेचून सोपे सोपे प्रश्न पेपरातले
सोडवणे जमले की,कळायचे
काठावर पास नक्की होता येते ।।
मोठ्या वर्गातल्या कठीण गणिताने
कधी मोकळा श्वास घेऊ दिला नाही
भूमिती, बीज गणित, त्रिकोनामिती
यात कधीच नव्हती आमची गती ।।
गणित विषय होता शत्रू ,हे जरी खरे
होता तो दयाळू मित्र, हे पुढे कळाले
बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार
बँकेतल्या नोकरीत सदा कामा आले ।।
आमची पिढीच गणिताला भिणारी
जुळवून घेण्यास सदा घाबरणारी
गड गणिताचा सर करणे जमले नाही
अजून ती भीती मनातून गेली नाही ।।
————————————————
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
————————————————–

