ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी अमोल केसरकर.
जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र.
वैभववाडी
ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली संस्था म्हणजेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र. या संस्थेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सावंतवाडी येथील बँक निवृत्त अधिकारी श्री. अमोल केसरकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडी तालुका शाखेची पुनर्रचना करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची सभा
जिल्हाध्यक्ष व राज्य
सहसचिव प्रा.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी जिल्हा संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी, सहसंघटक श्री. प्रमोद मोहिते, सल्लागार ॲड. समीर वंजारी व प्रसिद्धी प्रमुख प्रा.रुपेश पाटील, सुकन्या टोपले, स्वप्नील लातये, प्रताप सावंत, देवेंद्र नाईक, दत्ताराम नाईक, विनायक गांवस, साबाजी परब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची रचना, कार्यपद्धतीची सविस्तर माहिती प्रा.सुरेश पाटील यांनी दिली. यावेळी सहसंघटक श्री.प्रमोद मोहिते व प्रसिद्धी प्रमुख प्रा.रुपेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वानुमते निवृत्त बँक अधिकारी श्री.अमोल सखाराम केसरकर यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हा शाखेने आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडू असे आश्वासन नवनियुक्त तालुकाध्यक्ष अमोल केसरकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी यांनी केले तर सल्लागार ॲड. समीर वंजारी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

