You are currently viewing रवींद्र गुरव यांच्या बे दुणे शून्य कादंबरीस पुरस्कार प्रदान 

रवींद्र गुरव यांच्या बे दुणे शून्य कादंबरीस पुरस्कार प्रदान 

गारगोटी / प्रतिनिधी :

कोनवडे (ता.भुदरगड) येथील साहित्यिक रवींद्र रेखा गुरव यांच्या बे दुणे शून्य या कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दामाजीनगर शाखेचा शहिद राजकुमार ठोंबरे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण जेष्ठ विचारवंत व व्याख्याते प्रा.डॉ. अरुण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. दसवेश्वर चेणगे होते.

रवींद्र रेखा गुरव हे इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे. तसेच त्यांना चौफेर वाचन आणि लेखनाची आवड असून वेगवेगळ्या दिवाळी अंक व मासिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांचा सावट हा कथा संग्रह व बे दुणे शून्य ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.

पुस्कार वितरण सोहळ्यात साहित्यिक डॉ. मुरहरी केळे, किरण भावसार, श्रीनिवास मस्के, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, डॉ. नंदकुमार राऊत, प्रा. अलका सपकाळ, भारती धनवे व रेश्मा गुंगे यांच्या पुस्तकांना देखील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर माजी पं.स.सभापती ॲड. नंदकुमार पवार, म.सा.प. पुणेचे विभागीय सचिव कल्याण शिंदे, म.सा.प. दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे आदींसह विविध मान्यवर, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा