सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यातील गोरं गरीब जनतेसाठी देवदूत म्हणून उभे असलेले सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तथा हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजित चीतारी यांच्या तडकाफडकी करण्यात आलेल्या बदलीत मोठे षड्यंत्र असून राजकीय आकसापोटी त्यांची बदली करण्यात आली आहे. त्याचा तालुका कॉंग्रेसच्या वतीने निषेध करत असल्याचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले आहे. ही बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा तालुका कॉंग्रेस रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल असा इशारा देखील त्यानी यावेळी बोलताना दिला आहे. या बदली संदर्भात आपण महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब थोरात व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. डॉ चीतारी हे दिवसरात्र आपल्या आरोग्याची पर्वा न रुग्णांना सेवा देत असतात त्यांची सावंतवाडी तालुक्यातील जनतेला गरज असून त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे.
राजकीय आकसापोटी डॉ. चितारी यांची बदली काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा आरोप….
- Post published:सप्टेंबर 5, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments