You are currently viewing आधी नमन तुजला

आधी नमन तुजला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

आधी नमन तुजला

 

    🌹नमन🌹

       

एकदंता विघ्नहरा

आधी नमन तुला

पार्वतीच्या मुला

गजानना।।🌹

 

बुध्दीदाता वरदाता

सूक्ष्मचक्षु ज्ञान विवेका

तूच विनायका

गणपती।।🌹

 

एकवीस दूर्वांकुर

पुष्प रक्तवर्ण जास्वंद

अर्पिता आनंद

मनाला।।🌹

 

नैवेद्य मोदकाचा

बहू तुला आवडे

भक्तीने साकडे

घालतो।।🌹

 

वाणी शुध्द

मती असो निर्मळ

तुझेच सकळ

कृपाशिष।।🌹

 

 

अरूणा दुद्दलवार🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा