नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी 1 ते 8 जुलै रोजी ऑनलाईन परिक्षेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
नोंदणी व मुद्रांक विभागात ऑनलाईन शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरतीकरीता आय.बी.पी.एस. (इंस्टीटयुट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीकडुन 22 एप्रिल 2025 ते 16 मे 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. त्यानुसार आय.बी.पी.एसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची शिपाई पदासाठी 1 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -1 प्राची घोलप यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
या परीक्षेचे प्रवेशपत्र ,हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. यांचेकडून पाठविण्यात येणार आहे. परीक्षेकरीता विभागाकडुन कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणुक करण्यात आली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडुन, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासुन उमेदवारांनी कृपया सावध राहावे,असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

