You are currently viewing मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचा कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार गोविंद श्रीमंगले यांच्याकडे..

मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचा कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार गोविंद श्रीमंगले यांच्याकडे..

कुडाळ :

मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपालचे कार्यकारी अभियंता श्री हर्षद यादव यांची बदली टेंभू उपसा प्रकल्प विभागीय पथक सांगली येथे झाली आहे. त्यामुळे श्री गोविंद हनुमंतराव श्रीमंगले यांनी मध्यम प्रकल्प विभागीय पथक आंबडपाल या विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार आज शुक्रवार रोजी स्वीकारला.

श्री गोविंद श्रीमंगले हे गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल, कुडाळ येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी या विभागांतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 लघु पाटबंधारे प्रकल्प व 4 केटीवेअरचे सिंचन व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले आहे. मध्यम प्रकल्प विभागीय पथकाच्या अंतर्गत अरुणा प्रकल्प व देवघर प्रकल्प येत असून या प्रकल्पाच्या कालव्यांची कामे चालू आहेत. सिंचन व्यवस्थापनाचा व या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अनुभव कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांना असल्यामुळे ते यशस्वीपणे ही जबाबदारी स्वीकारतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा