You are currently viewing मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक

मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक

*मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक*

पिंपरी

बुधवार, दिनांक ११ जून २०२५ रोजी महाराष्ट्र विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आदेशाने मोशी येथे सुरू असलेल्या न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. सदरच्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उज्ज्वला घावटे यांनी बांधकाम ४० टक्के होत आलेले असून येत्या डिसेंबर २०२५पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन पुढील एप्रिलपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळविण्यात आले. सदर बांधकामाची सध्याची परिस्थिती फोटोद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बैठकीमध्ये दाखवण्यात आली. सदर बांधकामासाठी यावर्षी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे; तसेच उर्वरित बांधकामासाठी अजून पन्नास कोटींचा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले. उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
सदरची बैठक झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांची मुंबई येथे उच्च न्यायालयात भेट घेऊन सदर बैठकीचा आढावा आणि सर्व माहिती त्यांना देण्यात आली. निधीबाबत त्यांनी उच्च न्यायालयामार्फत शासनाला लवकरच माहिती देण्यात येईल याबाबत ग्वाही दिली; तसेच मोशी येथे न्यायालयाच्या कामकाजाबाबत पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांना माहिती देऊन न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे स्वतः लवकरच मोशी येथे न्यायालयाच्या कामकाजाबाबत स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार आहेत.

सदरच्या आढावा बैठकीत महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटना अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे, पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. रामराजे जी. भोसले – पाटील, ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. अजिंक्य लोमटे, ॲड. सय्यद सिकंदर अली यांनी उपस्थित राहून चर्चा केली. न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन न्यायालयाच्या संख्येत वाढ होणार असल्याने तसेच जिल्हा व सत्र न्यायालय लवकरच पिंपरी – चिंचवड शहरामध्ये येणार असल्यामुळे समस्त पिंपरी – चिंचवडमधील वकील आणि नागरिकांमध्ये उत्साह, आनंद होत असल्याचे ॲड. अतिश लांडगे व माजी अध्यक्ष ॲड. रामराजे जी. भोसले – पाटील सांगितले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
——————————————-
*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
========================

11वी *science* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Subject
*Physics, chemistry*
*Maths, Biology, IT*

*9 जून* पासून बॅच सुरू.
( पहिले 10 दिवस मोफत लेक्चर )
=========================

11वी *commerce* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
Subject
*Account, Economics,*
*Maths, English*

*9 जून* पासून बॅच सुरू.
=========================

*MHT- CET 2026* *दर रविवारी विशेष मार्गदर्शन*
रत्नागिरी मधील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *सुवर्णसंधी*
Group.*PCM / PCB*
बॅच सुरू..*8 जून 2025 पासून सुरू.*
========================

*12वी science* च्या विद्यार्थ्यांसाठी.
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*

Batch timing
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )

========================

*12वी commerce* च्या विद्यार्थ्यांसाठी.
Subject
*Account, Economics, Maths, English*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*

Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )

========================

*8वी ते 10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*

विषय
*Maths, science*
*English, Sanskrit*

8वी आणि 9वी *9 जून 2025 पासून सुरू* प्रवेश सुरू आहे.
10 वी ची बॅच *7 एप्रिल पासून सुरू झाली आहे.*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा