You are currently viewing संत कबीर

संत कबीर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”संत कबीर”*

 

संत कबीरांनी विश्वाला दिली ज्ञानाची ज्योत

फकीर जोगी ईश्वरभक्तांस करू वंदनIIधृII

 

लहरतारा तळी सापडले मूल पंकजात

अनाथां भेटले निमा निरू मात पिता रूपांत

विणकर पुत्राचे झाले कबीर नामकरणII1II

 

रूढी परंपरा धर्मांधतेत गेले बालपण

परिस्थितीमुळे न मिळाले त्यांना शिक्षण

अनुभव मिळाले साधुसंतांच्या सत्संगातII2II

 

निर्भिड निर्गुण भक्ती शिकवे कवी महान

रमेनी सबद साखी दोहे रचिले कबिरानं

कबीरांचे हिंदी साहित्यात महत्व अनन्यII3II

 

कबीराचे दोहे हिंदू यवनांना करी एकत्र

शिकवती समभाव सर्वां टाळती भेदाभेद

राम गोविंद गोविंद हरी करती उच्चारणII4II

 

कबीरांना व्यवहारिक बाबींचे सूक्ष्मज्ञान

सर्वांत प्रचंड शक्ती आहे पहावे ओळखून

कबीरांची वाणी शक्तीवर्धक अमृता समान II5II

 

कबीराची साधी राहणी उच्च तत्वज्ञान

शिकवले जगाला सहज धर्माचे आचरण

निर्गुण निष्काम भक्ती त्यांच्या भजन दोह्यांतII6II

 

कबीर आदर्श समाज सुधारक श्रेष्ठ संत

सहज सरळ सोप्या भाषेत देती ज्ञान

विकृत प्रथांना मोडून करिती प्रबोधनII7II

 

अहं गळल्यावर स्फुरते प्रेमाचे सृजन

प्रेम वेदना करुणा ममता उमदे पण

कबीर सांगी प्रेम सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम ज्ञानII8II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा