मॅगी
पाच रुपयांची मॅगी,
शिजवून मला घालताना,
मला दिसत होत्या वेदना,
त्यात उकळी फुटताना.
तिथेही तू खुशीत हसतेस.
मॅगीचं पाणी अन,
मसाल्यात एकरूप होणं,
उकळत्या पाण्यातही,
मसाल्याला कवेत घेऊन,
खऱ्या प्रेमाची साक्ष देतेस.
जेव्हा तू मॅगी,
अलगद भांड्यात ओततेस,
गरगरीत फुललेल्या,
वाफाळलेल्या मॅगीसारखी,
तू धूसर दिसतेस.
लांब लांब त्या
मॅगीच्या कांड्या,
काटेचमच्याने गुंडाळताना,
वाटतं जणू तू माझ्या,
घठ्ठ मिठीत येतेस.
माझ्या ओठांनी मॅगीच्या,
कांड्या ओढून घेताना,
स्पर्श जाणवतो जसा,
तुझ्या ओठांना होताना,
जणू तू माझ्यात सामावून जातेस.
कसोटीच्या या क्षणांमध्ये,
मॅगी सुद्धा परीक्षा देते.
उकळते, शिजते, मिसळते,
तू सुद्धा मॅगीसारखीच…
माझ्यात स्वतःला हरवून घेतेस.
पाच रुपयांची मॅगी…!!
(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६