कुडाळ : तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे ॲटलंस माॅथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भला मोठा पतंग आढळून आला. आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुरनिड पतंग आहे. हा पतंग १२ इंच एवढा मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे. या पतंगाचे आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. हा पतंग दक्षिण भारत व श्रीलंकेत आढळून येतो. मात्र हा पतंग कुडाळ नेरूर गावात आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेमध्ये आणखीन एका नवीन दुर्मिळ प्रजातीची नोंद झाली आहे.
नेरूर येथे आढळला ॲटलंस माॅथ दुर्मिळ पतंग
- Post published:जून 7, 2025
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सर्वसामान्यांना नौसेनेचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी दांडी – तारकर्ली येथे खास व्यवस्था
वैभववाडी एडगाव येथे ७४ हजारचा गुटखा जप्त
दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान ‘नराचा नारायण’ श्री देव जैतीर उत्सवात येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत ! – श्री. आनंद गावडे
