You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प- २६ वे

श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प- २६ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प- २६ वे*

_________________________

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

************

 

सैरावैरा आमुचे मन धावे । याला तुम्हीच रोकावे । शांत करावे । स्वामी समर्था ।। १ ।।

 

कच्छ-त्रिविक्रम देवालय क्षेत्री राहिले । तिथुनिया पुढे निघाले । क्षेत्र द्वारकापुरीला येणे जाहले । श्रीकृष्ण-दत्तात्रय-नृसिंहमुनी” नावाने स्वामी इथे परिचित झाले ।। २।।

 

इथे एक जन्मांध तपस्वी साधू रहात होते । नाव त्यांचे सूरदास असे होते । साधू,श्रीकृष्ण दर्शनाची आस मनी

बाळगून होते ।परी साधनेस फळ येत नव्हते ।। ३ ।।

 

त्या साधूच्या आश्रमात स्वामी गेले । त्यास बोलले ।

ज्याच्या दर्शनास मन तुझे आतुरले । तो मी, समोर तुझ्या उभा आहे ।। ४ ।।

 

स्वामींनी हस्त-स्पर्श केला । अंध सुरदासाच्या डोळ्याला।

डोळे उघडताच सुरदासाला । द्वारकाधिश श्रीकृष्ण दिसू लागला ।। ५ ।।

 

या सुरदासाला । त्रिविध तापातून मुक्त केला । भक्त उद्धरीला । स्वामींनी ।। ६ ।।

**********

करी क्रमशः हे लेखन कवी अरुण दास

___________________________

कवी अरुण दास- अरुण वि.देशपांडे -पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा