*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*झाडे लावा झाडे लावा…*
निश्चयाचा महामेरू चला पेरूया चांगले
वडबाबा वृद्ध झाले पक्षीगण ते पांगले
आसरा देऊ चला हो खूप झाडे लावूनी
तृप्त करती सारी झाडे फळ मधुर देऊनी..
पान पान फुल फुल मूळ खोडही चंदन
अंग आपुल्या जीवनाचे चला करू वंदन
अर्पिती ते जीव आपुला माणसास कणकणं
वृक्षापरते अन्य नाही जीवनी कोणते धन..
पाणी घाला नाही घाला ना कधी ती कुरकुर
प्राणशक्ती जोवरी ते देत असती भरपूर
पाणी धरूनी ठेविती ती मुळे जमिनी सुपिकता
पाणी साठा वाढतो हो तृप्त होते ती मृदा..
जलसाठा वाढतो धरेचा फोफावती वृक्ष
प्रजापती ते प्राणवायू देण्या असती दक्ष
एक झाड एक माणूस आहे साधे गणित
जगवण्यास माणूस वृक्ष वाढवा खचित…
हिरवागार करा वसुला सौंदर्याने खुलवा
जागोजागी उद्याने नि वृक्षफुलोरा फुलवा
जगवतील झाडेच आपणा दगडावरची रेघ
दिसता झाडे जागोजागी उतरतात मेघ…
सुजलाम सुफलाम होते धरती वाहती खुशीचे वारे
झाडे लावा झाडे लावा झाडे लावा रे …
. … झाडे लावा वाढवा रे….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

