You are currently viewing वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉलमध्ये वस्तू संच वाटप

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉलमध्ये वस्तू संच वाटप

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉलमध्ये वस्तू संच वाटप

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच (भांडी वाटप) करण्यात येत आहे. मे. मफतलाल इंडस्ट्रिज लि. यांच्यामार्फत 3 जून 2025 रोजी तरळे ग्रामपंचायत येथील वस्तुसंच वाटप कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी 5 जून 2025 रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉल, ता. वैभववाडी येथे करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम कामगारांनी यांची नोंद घ्यावी. तसेच नोंदीत जिवीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी संबंधी ठिकाणी उपस्थितीत राहून वस्तुसंच प्राप्त करुन घेण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.

             या गृहउपयोगी वस्तू संच हे विनामुल्य देण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी. तसेच संच प्राप्ती करता काही कामगार हे एजंट, व्यक्ती किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करीत असल्याचे समजत आहे. तरी या कार्यालयामार्फत असे  सूचीत करण्यात येते की कामगारांनी अशा कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये, जर अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारातून फसवणूक झाल्यास त्यास सरकारी कामगार कार्यालय जबाबदार रहाणार नाही. तरी अशा फसवणूकीबाबत तक्रार असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करुन रितसर तक्रार दाखल करण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा